GullyBuy (पुण्यातील स्टार्टअप कंपनी) आज ४ कोटी रुपयांचा पूर्व-Series A निधी मिळाल्याची घोषणा करत आह

Click here to read in English

हिंदी में पढ़ने के लिए यहां क्लिक करें


Gullybuy या निधीचा वापर अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी आणि सॉफ्टवेअर प्रॉडक्ट च्या विकासासाठी करणार आहे

पुणे, सप्टेंबर १५, २०२०: GullyBuy ह्या पुण्यातील स्टार्टअप कंपनीने आज ४ कोटी रुपयाचा पूर्व-Series A निधी SEED Enterprises LLP आणि काही वैयक्तिक गुंतवणुकदारांकडून मिळाल्याचे जाहीर केले. Gullybuy सॉफ्टवेअरने एक अद्वितीय डिजिटल हायपरलोकल मार्केटप्लेस सोल्यूशन प्रदान केले आहे. ते वापरून खरेदीदार जवळील / शहरातील दुकानांमधुन किराणा सामान, अन्न/ भोजनालय, औषधे आणि रोजच्या आवश्यक वस्तूंची खरेदी ऑनलाईन करू शकतात. ग्राहक आणि विक्रेता (स्टोअर / रेस्टॉरंट्स) यांसाठी स्वतंत्र मोबाइल अ‍ॅप्ससही तयार केलेले आहेत. Gullybuy चे बिझनेस मॉडेल हे अत्यंत कमीतकमी गुंतवणीच्या तत्वावर तयार केले आहे.


SEED Enterprises LLP ही अविनाश सेठी, मितेश बोरा आणि सिद्धार्थ सेठी यांची फॅमिली ऑफिस इन्व्हेस्टमेंट फर्म आहे. तिघेही Infobeans Technologies Ltd ह्या NSE लिस्टेड कंपनीचे संस्थापक आहेत. सिद्धार्थ सेठी, संस्थापक आणि CEO Infobeans, म्हणाले की, “ जरी ऑफलाईन ते ऑनलाईन रिटेल सोल्युशन्स प्रचलित होत असले तरी आम्ही GullyBuy ला त्यांच्या स्थानिक दुकानांना आत्मनिर्भर करायच्या दूरद्रुष्टीमुळे साथ द्यायचे ठरवले आहे. स्थानिक दुकानांना डिजिटल अर्थव्यवस्थेचा फायदा मर्यादित मिळालेला आहे. इतर सेवा ह्या एकतर दुकानांना वैयत्तिक ऑनलाईन सेवा देतात आणि पुरवठा सेवा अँप्स दुकानांना टाळून सेवा देतात. प्रचंड मोठ्या ईकॉमर्स कंपन्या तर दुकानांना केवळ त्यांचे प्रतिनिधी बनवत आहेत. GullyBuy ची टीमही अत्यंत प्रतिभावान आणि अनुभवी आहे आणि आम्हाला खात्री आहे की ते नक्कीच यशस्वी होतील.”


Gullybuy चे मोबाइल अ‍ॅप्स स्थानिक स्टोअरसह नियमितपणे खरेदी-विक्री व्यवहारांच्या अनौपचारिक स्वरुपावर संरेखित आहेत. USER अ‍ॅप मधुन अत्यंत सोप्या आणि सहजपणे ऑर्डर देता येते. वापरकर्त्यास मागील ऑर्डरमधील items निवडता येतात, कॅटलॉग मधील प्रॉडक्ट्स ऑर्डर करता येतात, संग्रहित करता येतात किंवा साध्या मजकूरात आयटम टाईप करता येतात. ऑर्डर मधील मजकुर व्हॉइस इनपुट द्वारा शक्य आहे. तसेच ग्राहकांना विशेष ऑफर दिल्या जातात. दुकानांनी व्हेंडर अ‍ॅप डाउनलोड करुन KYC पूर्तता केली कि लगेचच दुकाने ऑनलाईन येऊन ऑर्डर्स स्वीकारू शकतात. दुकानांचे मालक त्यांच्या सोयीनुसार प्रॉडक्ट्स ची यादी दाखवू शकतात, डिस्काउंट देऊ शकतात. ग्राहक दुकानांना थेट ऑनलाईन पेमेन्ट करू शकतात. दोन्हीही अॅप्स सध्या फ्री आहेत.


शिरीष देवधर, सह-संस्थापक GullyBuy, असे म्हणाले - "SEED ने आमच्या वर दाखवल्या विश्वासामुळे आम्ही अतिशय आनंदित आहोत. ह्या गुंतवणुकीमुळे आमची SALES टीम्स अधिक जोमाने अँप्स प्रसिद्धी करू शकतील आणि आमची Engineering टीम अधिक वेगाने प्रॉडक्ट रोडमॅप वर काम करू शकतील. ह्या क्षेत्रात अमर्यादित संधी आहेत पण स्पर्धाही अत्यंत तीव्र आहे आणि म्हणुनच आम्ही अधिक गुंतवणीसाठी प्रयत्नशील असु."


स्वाती देवधर, सह-संस्थापक Gullybuy, म्हणाल्या - "आम्ही संकल्पना सिद्ध करण्यासाठी प्राथमिक स्वरूपातील अ‍ॅप्स प्रकाशित केली आहेत. अत्यंत नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये लवकरच अॅप्स मध्ये येत आहेत. Machine Learning वापरुन प्रॉडक्ट्स च्या शिफारशी , analytics, वितरण सेवेसाठी भागीदारी , स्थानिक भाषेमधून अ‍ॅप्सचा वापर ही काही महत्वाची वैशिष्ट्ये लवकरच येत आहेत.“


GullyBuy सॉफ्टवेअर:

दिग्गज मालिका उद्योजकांच्या टीम ने GullyBuy सॉफ्टवेअर ही स्टार्टप संस्था पुण्यात ऑक्टोबर २०१९ मध्ये स्थापन केली आहे . या उद्योजकांनी आतापर्यंत यशस्वी सॉफ्टवेअर संस्था स्थापन आणि यशस्वीरीत्या मोठ्या केल्या आहेत. Gullybuy चे व्हिजन ‘Simplify Shopping, Simplify Life through a digital marketplace platform that directly connects buyers and stores in neighborhoods (गल्लीज् ) across India’ असे आहे.
Download GullyBuy User App: खरीदारी अब आसान
Media Contact:

Koeli Chatterjee, Sr. Manager - Marketing & Communication, GullyBuy Software | koeli@gullybuy.com36 views

Get our latest updates

Company
Resources
Download App

For Users

For Vendors / Shops (Android)

GB_Logo_TM-02.png
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • LinkedIn

© 2020 by GullyBuy Software Pvt Ltd. All rights reserved.

Illustrations by Freepik Stories